या संकेतस्थळावर श्री ह.भ.प. महंत पुरुषोत्तम महाराज, श्री ह.भ.प.अंगद महाराज ढाळेगावकर , श्रीकृष्णा भैय्या ढाळेगावकर, श्री ह.भ.प. सोमेश्वर महाराज ढाळेगावकर आणि श्री ह. भ. प. शंकरभाऊ लोंढे सोनमांजरीकर यांचा आपणांस सप्रेम राम कृष्ण हरी !

Tuesday, June 6, 2023

आषाढी वारी - 2023 कार्यक्रम पत्रिका

 🙏 !! जय हरी !! 🙏

🚩आषाढी वारी सोहळा-२०२३🚩 


श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माउली यांचा 
श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर

॥ आषाढी पायी वारी पालखी सोहळा ॥

प्रारंभ - ज्येष्ठ कृष्ण ४ शके १९४५
दिनांक : ०७ / ०६ / २०२३ बुधवार.

सांगता - आषाढ शुक्ल १२ शके १९४५
दिनांक : ३० / ०६ / २०२३ शुक्रवार.
    

    ♦️  सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत नारायणजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व वारकरी भाविकांच्या सहकार्याने ज्ञानराज आश्रम ढाळेगांव, ता. अहमदपूर जि. लातूर यांनी आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. श्री संत नारायणजी महाराज मुळ समाधी मंदीर, श्री क्षेत्र ढाळेगांव येथून मित्ती ज्येष्ठ कृ. ४ शके १९४५ दि.७.०६.२०२३ बुधवारी सकाळी ७ वा. दिंडीचे प्रस्थान होईल. 


♦️  श्री क्षेत्र ढाळेगांव येथून कुर्मदास, आरण, श्री क्षेत्र पंढरपूर, नारायणपूर बालाजी,सासवड, देहू मार्गे आळंदी क्षेत्रात मित्ती ज्येष्ठ कृ.६ शके १९४५ दि. ०९.०६.२०२३ शुक्रवारी दिंडीचे आगमन होईल. माऊलींचे प्रस्थान मित्ती ज्येष्ठ कृ.८ शके.१९४५ दि. ११.०६.२०२३ रविवारी होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. ही नम्र विनंती.

कार्यक्रम पत्रिका डाऊनलोड करा. Click here to download.



वारीतील मुक्काम मॅपवर पाहण्यासाठी  खालील मुक्कामावर क्लिक करा ....


⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

🌹 राम कृष्ण हरि 🌹
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩