या संकेतस्थळावर श्री ह.भ.प. महंत पुरुषोत्तम महाराज, श्री ह.भ.प.अंगद महाराज ढाळेगावकर , श्रीकृष्णा भैय्या ढाळेगावकर, श्री ह.भ.प. सोमेश्वर महाराज ढाळेगावकर आणि श्री ह. भ. प. शंकरभाऊ लोंढे सोनमांजरीकर यांचा आपणांस सप्रेम राम कृष्ण हरी !

Monday, June 17, 2019

आषाढी वारी सोहळा - २०१९

 🙏 !! जय हरी !! 🙏

🚩आषाढी वारी सोहळा-२०१९🚩  



श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माउली यांचा 
श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर

॥ आषाढी पायी वारी पालखी सोहळा ॥

प्रारंभ - ज्येष्ठ कृष्ण ४ शके १९४१
दिनांक : २१ / ०६ / २०१९ शुक्रवार.

सांगता - आषाढ शुक्ल १२ शके १९४१
दिनांक : १३ / ०७ / २०१९ शनिवार.
    

    ♦️  सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत नारायणजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने आणि श्री क्षेत्र ढाळेगांव परिसरातील भाविकांच्या सहकार्याने ज्ञानराज आश्रम ढाळेगांव, ता.अहमदपूर जि.लातूर यांच्या अधिपत्याखाली आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. श्री संत नारायणजी महाराज मुळ समाधी मंदीर, श्री क्षेत्र ढाळेगांव येथून मित्ती ज्येष्ठ कृ.४ शके १९४१ दि.२१-०६-२०१९ रोज शुक्रवारी सकाळी ७ वा दिंडीचे प्रस्थान होईल.


♦️  श्री क्षेत्र ढाळेगांव येथून कुर्मदास ,अरण, श्री क्षेत्र पंढरपूर, नारायणपूर (बालाजी ),सासवड, देहूगांव मार्गे आळंदी क्षेत्रात मित्ती ज्येष्ठ कृ.६ शके १९४१ दि.२३.०६.२०१९ रोज : रविवारी दिंडीचे आगमन होईल. माऊलीचे प्रस्थान मित्ती ज्येष्ठ कृ.८ शके. दि.२५-०६-२०१९ मंगळवार रोजी होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. ही नम्र विनंती.

कार्यक्रम पत्रिका डाऊनलोड करा. Click here to download.


⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

🌹 राम कृष्ण हरि 🌹
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩