🙏 !! जय हरी !! 🙏
ॐ 🚩आषाढी वारी सोहळा-२०२२🚩 ॐ
श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माउली यांचा
श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर
॥ आषाढी पायी वारी पालखी सोहळा ॥
प्रारंभ - ज्येष्ठ कृष्ण ४ शके १९४४
दिनांक : १७ / ०६ / २०२२ शुक्रवार.
व
सांगता - आषाढ शुक्ल १२ शके १९४४
सांगता - आषाढ शुक्ल १२ शके १९४४
दिनांक : ११ / ०७ / २०२२ सोमवार.
♦️ सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत नारायणजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व वारकरी भाविकांच्या सहकार्याने ज्ञानराज आश्रम ढाळेगांव, ता. अहमदपूर जि. लातूर यांनी आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. श्री संत नारायणजी महाराज मुळ समाधी मंदीर, श्री क्षेत्र ढाळेगांव येथून मित्ती ज्येष्ठ कृ. ४ शके १९४४ दि.१७.०६.२०२२ शुक्रवारी सकाळी ७ वा. दिंडीचे प्रस्थान होईल.
♦️ श्री क्षेत्र ढाळेगांव येथून कुर्मदास, आरण, श्री क्षेत्र पंढरपूर, नारायणपूर बालाजी,सासवड, देहू मार्गे आळंदी क्षेत्रात मित्ती ज्येष्ठ कृ.६ शके १९४४ दि. १९.०६.२०२२ रविवारी दिंडीचे आगमन होईल. माऊलींचे प्रस्थान मित्ती ज्येष्ठ कृ.८ शके.१९४४ दि. २१.०६.२०२२ मंगळवारी होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. ही नम्र विनंती.
⛳कार्यक्रम पत्रिका डाऊनलोड करा. Click here to download.
वारीतील मुक्काम मॅपवर पाहण्यासाठी खालील मुक्कामावर क्लिक करा ....
🛕आळंदी - पुणे - सासवड - जेजुरी - वाल्हे - लोनंद - तरडगाव - फलटण - बरड - नातेपुते - माळशिरस - वेळापूर - भंडीशेगाव - वाखरी - पंढरपूर🛕
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳


