या संकेतस्थळावर श्री ह.भ.प. महंत पुरुषोत्तम महाराज, श्री ह.भ.प.अंगद महाराज ढाळेगावकर , श्रीकृष्णा भैय्या ढाळेगावकर, श्री ह.भ.प. सोमेश्वर महाराज ढाळेगावकर आणि श्री ह. भ. प. शंकरभाऊ लोंढे सोनमांजरीकर यांचा आपणांस सप्रेम राम कृष्ण हरी !

Thursday, June 2, 2016

तालमणी श्री नामदेवबुवा केंद्रे आनंदवाडीकर

आमचे प्रेरणास्थान :-

 गुरूवर्य तालयोगी श्री तालमणी नामदेव मामा केंद्रे आनंदवाडीकर





केंद्रे नामदेवबुवा गुरूवर्य । अद्भुत अद्वैताचे ज्ञानाचार्य । मृदंग तालयोगी स्वरसौंदर्य । ऐसे वादनाचार्य पुण्यमय ॥१॥


हातातुनि काढुनि ध्वनी । बोल शब्द ऐकोनि कर्णी । होय तल्लीन अंतःकरणी । ते तालमणी नादब्रम्ह ॥२॥ 


फळा ढाळेगांव मोळवणांते । पुण्यभूसी जडले नाते । गुरू नामदेवबुवा केंद्रे ते । साच जाणते परमार्थी ॥३॥