� !! जय हरी !! �
ॐ 🌹 जागतिक मराठी भाषा दिन🌹 ॐ
🌹 जागतिक मराठी भाषा
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹
🌹 ओवी ज्ञानेशाची ...
तो शांतुचि अभिनवेल ।
ते परियसा मऱ्हाटे बोल ।
जे समुद्राहूनि सखोल ।
अर्थभरित ॥२१३॥४॥
हां हो नवल नोहे देशी ।
मऱ्हाटी बोलिजे तरी ऐशी ।
वाणें उमटताहे आकाशीं ।
साहित्य रंगाचे ॥१३३॥
माझा मराठाचि बोलु कौतुकें ।
परि अमृतातेंही पैजां जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें ।
मेळवीन ॥१४॥६॥
इये मऱ्हाठियेचिया नगरीं ।
ब्रह्मविद्येचा सुकाळु करीं ।
घेणें देणें सुखचिवरी ।
हों देईं या जगा ॥१६॥१२॥
🌹 शांतीब्रम्ह नाथांचा मराठी
भाषेविषयी मार्मिक संदेश...
🌷मुक्ताफळालागीं सागरीं ।
बुड्या देती नानापरी ।
तें सांपडलिया घरींच्या विहिरीं ।
जो अव्हेरी तो मूर्ख ॥९५॥
🍃तैशी संस्कृत व्याख्यानआटाटी ।
अतिकष्टें परमार्थीं भेटी ।
तें जोडिल्या मराठीसाठीं ।
उपेक्षादृष्टि न करावी ॥९६॥
💎धनवंतु रत्नपारखी पुरा ।
तेणें धुळीमाजीं देखिल्या हिरा ।
गांठीं बांधोनि आणी घरा ।
पारखी खरा निजज्ञानें ॥९७॥
📿तैसें ज्ञाते विद्वज्जन ।
ग्रंथु मराठी देखोन ।
उपेक्षा न करितां करावा यत्न ।
पारखोनि चिद्रत्न साधावया ॥९८॥
🚩क्षुद्रदृष्टीं पाहणें पाहतां ।
बोलु लागेल व्यासाचे ग्रंथा ।
मा हे तरी मराठी कविता ।
सांडूनि कुटिलता पाहावी ॥९९॥
🚩तेवीं सनकादिकांचें जें ज्ञान ।
तेंचि मराठीभाषेमाजीं जाण ।
येथें ठेवूं जातां दूषण ।
दोषी आपण होइजे ॥७२॥
💫कां सुवर्णाचें केलें सुणें ।
परी तें मोलें नव्हेचि उणें ।
तेवीं सनकादिकांचीं ज्ञानें ।
देशभाषा हीनें नव्हतीच ॥७३॥
🌷देखोनि मराठी गोठी ।
न म्हणावी वृथा चावटी ।
पहावी निजबोधकसवटी ।
निजात्मदृष्टीं सज्जनीं ॥ ३१ ॥
🍃 संस्कृत वंद्य प्राकृत निंद्य ।
हे बोल काय होती शुद्ध ।
हाही अभिमानवाद ।
अहंता बंध परमार्थीं ॥ ३२ ॥
📿तेवीं संस्कृत आटाटी ।
करीतां परमार्थीं नव्हे भेटी ।
तेचि जोडल्या मराठीसाठीं ।
तेथ घालिती मिठी सज्ञान ॥ ३४ ॥
🌜चकोरां चंद्रामृतप्राशन ।
वायसां तेथें पडे लंघन ।
तेवीं हा महाराष्ट्र ग्रंथ जाण ।
फळाफळपण ज्ञानाज्ञानें ॥ ३५ ॥
📿 देवासी नाहीं भाषाभिमान ।
संस्कृत प्राकृत दोनी समान ।
ज्या भाषा केलें ब्रह्मकथन ।
त्या भाषां श्रीकृष्ण संतोषे ॥ ३६ ॥