॥ राम कृष्ण हरि ॥
श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माउली यांचा
श्री क्षेत्र आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूर
॥ आषाढी पायी वारी पालखी सोहळा ॥
प्रारंभ - ज्येष्ठ कृष्ण ४ शके १९४०
दिनांक : ०२ / ०७ / २०१८ सोमवार.
व
सांगता - आषाढ शुक्ल १२ शके १९४०
सांगता - आषाढ शुक्ल १२ शके १९४०
दिनांक : २४ / ०७ / २०१८ मंगळवार.
♦️ सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संत नारायणजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने आणि श्री क्षेत्र ढाळेगांव परिसरातील भाविकांच्या सहकार्याने ज्ञानराज आश्रम ढाळेगांव, ता.अहमदपूर जि.लातूर यांच्या अधिपत्याखाली आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले आहे. श्री संत नारायणजी महाराज मुळ समाधी मंदीर, श्री क्षेत्र ढाळेगांव येथून मित्ती ज्येष्ठ कृ.४ शके १९४० दि.०२-०७-२०१८ रोज सोमवारी सकाळी ७ वा दिंडीचे प्रस्थान होईल.
♦️ श्री क्षेत्र ढाळेगांव येथून कुर्मदास ,अरण, श्री क्षेत्र पंढरपूर, नारायणपूर (बालाजी ),सासवड, देहूगांव मार्गे आळंदी क्षेत्रात मित्ती ज्येष्ठ कृ.६ शके १९४० दि.०४.०७.२०१८ रोज : बुधवारी दिंडीचे आगमन होईल. माऊलीचे प्रस्थान मित्ती ज्येष्ठ कृ.८ शके.१९४० दि.०६-०७-२०१८ रोज शुक्रवारी होणार आहे. तरी भाविकांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा. ही नम्र विनंती.
⛳कार्यक्रम पत्रिका डाऊनलोड करा. Click here to download.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
