या संकेतस्थळावर श्री ह.भ.प. महंत पुरुषोत्तम महाराज, श्री ह.भ.प.अंगद महाराज ढाळेगावकर , श्रीकृष्णा भैय्या ढाळेगावकर, श्री ह.भ.प. सोमेश्वर महाराज ढाळेगावकर आणि श्री ह. भ. प. शंकरभाऊ लोंढे सोनमांजरीकर यांचा आपणांस सप्रेम राम कृष्ण हरी !

Sunday, November 8, 2020

वारकरी वैष्णव रोजनिशी वापरासंबंधी मार्गदर्शक माहिती





🚩यात  वारकरी संप्रदायातील दैनंदिन महत्त्वपूर्ण माहिती आणि कार्यक्रम पत्रिकेसह कार्यक्रमाची नोंद आपण ठेवू शकता.  



१.  दिनविशेष  - वारकरी संप्रदायातील महत्त्वपूर्ण माहिती ,संतांच्या पुण्यतिथि, देवांचे उत्सव, तिथी,वार आणि तारीख या सर्व गोष्टी प्रथम स्क्रीनवरच दैनंदिन पाहायला मिळतील.


  माझे कार्यक्रम  

 २. कार्यक्रमाच्या पॉम्पलेटसह कार्यक्रमाची नोंद ठेवू शकता.

३. एका दिवसातील अनेक कार्यक्रम जोडू शकता. 

४.कार्यक्रमात झालेले बदल जतन करू शकता. 

५. एखादा कार्यक्रम हटवू शकता.

६. या तारखेला कार्यक्रम घेतलेला आहे हे समजण्यासाठी त्या तारखेला विशिष्ट कलरने चिन्हांकित करू शकता.

७. ज्या तारखेच्या कार्यक्रमात तुम्ही बदल कराल त्या तारखेचा कलर ॲटोमॅटीक "चॉकलेटी कलर" होतो.

८. प्रत्येक तारखेचा पहिल्यांदा घेतलेला कार्यक्रम आणि सेव्ह असलेला त्याच तारखेला प्रथम स्क्रीनवर पाहायला मिळतो आणि त्याच तारखेला अप्लिकेशन ओपन केल्याबरोबर पॉप-अप संदेश प्राप्त होतो.

९. कोणत्याही तारखेचा आपला कार्यक्रम आपल्या मित्रांना डायरेक्ट कार्यक्रम पत्रिकेसह शेयर करू शकता.



 कोणत्याही तारखेवर क्लिक केल्याबरोबर दोन क्रिया होतात. 

१. त्या तारखेला अगोदर कार्यक्रम सेव्ह केलेला नसेल तर नवीन कार्यक्रम सेव्ह करा असा पॉप-अप संदेश प्राप्त होतो.

२. त्या तारखेला अगोदरच कार्यक्रम सेव्ह केलेला असेल तर प्रथम स्क्रीनवरच पाहायला मिळतो.


  कोणत्याही तारखेवर ( दोन सेकंद तसेच बोट ठेवल्यावर ) लॉंग क्लिक केल्याबरोबर आपल्याला एक पॉप-अप संदेश प्राप्त होतो आणि त्यात आपण दोन क्रिया करू शकतो.  

१. आपण त्या तारखेला नवीन कार्यक्रम जोडू शकतो. म्हणजे त्या तारखेला तो कार्यक्रम दुसरा,तिसरा,चौथा आणि पाचवा इत्यादी जोडू  शकतो.

२. त्या तारखेच्या अनेक कार्यक्रमांपैकी प्रथम घेतलेला आणि सेव्ह असलेला कार्यक्रम डिलीट करू शकतो.



  माझे कार्यक्रम  या यादीतील कोणत्याही कार्यक्रमाला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॉप-अप संदेश प्राप्त होतो आणि आपल्यासमोर त्या कार्यक्रमाची पत्रिका आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळते. तिथेच आपल्याला तोच कार्यक्रम आपल्या मित्रांना शेअर करण्यासाठी तिथे सुविधा मिळते.  


  माझे कार्यक्रम या यादीतील कोणत्याही कार्यक्रमावर ( दोन सेकंद तसेच बोट ठेवल्यावर ) लॉंग क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पॉप-अप संदेश प्राप्त होतो.  तिथेेेे आपण दोन क्रिया करू शकतो.  

१. ज्या कार्यक्रमावर आपण क्लिक केले आहे तो कार्यक्रम कायमचा हटवू शकतो.( डिलीट )

२. ज्या कार्यक्रमावर आपण क्लिक केले आहे त्याच कार्यक्रमात झालेला बदल जतन करू शकतो. (एडिट )




वारकरी रोजनिशी

  वारकरी रोजनिशी डाऊनलोड करा. 




  सर्व वारकऱ्यांना राम कृष्ण हरी !