या संकेतस्थळावर श्री ह.भ.प. महंत पुरुषोत्तम महाराज, श्री ह.भ.प.अंगद महाराज ढाळेगावकर , श्रीकृष्णा भैय्या ढाळेगावकर, श्री ह.भ.प. सोमेश्वर महाराज ढाळेगावकर आणि श्री ह. भ. प. शंकरभाऊ लोंढे सोनमांजरीकर यांचा आपणांस सप्रेम राम कृष्ण हरी !

Monday, July 18, 2016

॥ श्री संत नारायणजी अप्पा महाराज यांची आरती ॥


॥ श्री संत नारायणजी अप्पा महाराज ॥

 श्री मृदंगाचार्य कृष्णा महाराज ढाळेगांवकर विरचित

॥ श्री संत नारायणजी अप्पा महाराज यांची आरती ॥ 


निर्गुण निर्विकारी स्वये श्रीहरी । 
ढाळेगांव क्षेत्री अवतरले भूवरी ॥ 
लौकीक सांडुनि प्रेम भक्ती प्रस्तारी । 
साधू संत योगी ध्याति अंतरी ॥ १ ॥


जयदेव जयदेव जय नारायणा । 
तारुनिया भवसिंधू उद्धरी दीना ॥धृ॥


ज्ञानियाचा अवतार भक्तशिरोमणी । 
घेई ढाळेगावीं समाधी संजीवनी ॥ 
शोभे द्वारी भक्तीपिंपळ सुवर्णी । 
नारायण माऊली कृपाळू दानी ॥ २ ॥


आषाढीचा सोहळा महिमा अनंत । 
अवघे भक्त जन येती वो संत ॥ 
घेवोनिया जलवेष धरेवर वर्षत । 
येती भेटीलागी स्वये भगवंत ॥ ३ ॥


ब्रह्मपदी साधू नित्य विराजे । 
पापा तापा होळी करी तंव तेजे ॥ 
हरी ध्याता कृपा करी हा सहजे । 
सेवि कृष्णदास सदा पदाम्बुजे ॥ ४ ॥



॥ श्री संत नारायणजी अप्पा 
संजीवन समाधी ॥








श्री क्षेत्र ढाळेगांवला कसे जावे यासाठी पुढच्या लिंक वर क्लिक करा.